पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तरंदळेतील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे नव्हे, तर समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करणे, या भावनेतून भारतीय जनता पार्टी, तरंदळे यांच्या वतीने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत तरंदळे येथील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरंदळे गावातील चार शाळांमधील चिमुकल्यांना प्रेमाने खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा आनंद लुटत आयोजकांचे आभार मानले.

या प्रसंगी कणकवली पंचायत समिती सदस्या संजना राणे, तरंदळेचे सरपंच सुशिल कदम, माजी सरपंच सुधीर सावंत, डॉ. सत्यवान राणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंत्री नितेश राणे यांच्या सामाजिक बांधिलकीचा उल्लेख करत, समाजोपयोगी उपक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतानाही विद्यार्थ्यांविषयी असलेले प्रेम आणि सामाजिक जाणीव या उपक्रमातून अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तरंदळेतील चारही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच नितेश राणे यांच्यासाठी वाढदिवसाचे खरे गिफ्ट ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!