कणकवली शहरातून वृद्धा बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : अलका अनंत साळवी (वय 75 रा. शिवाजीनगर कणकवली ) ह्या बेपत्ता झाल्याची खबर कणकवली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. गुरुवार 25 जून रोजी सकाळी 7 वाजता अलका साळवी ह्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या. शोधाशोध करूनही त्या सापडून आल्या नाहीत. अलका साळवी कोणाला सापडून आल्यास कणकवली पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक 02367232033 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अलका अनंत साळवी वय 75

error: Content is protected !!