बांदा (प्रतिनिधी) : आज सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
देशाच्या प्रगतीचा संकल्प, ‘विकसित भारत’चे स्वप्न, समाजातील सकारात्मक बदल, जनसहभाग आणि राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
यावेळी उपस्थित सर्वांनी देशहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त करत, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या विचाराला पुन्हा एकदा दृढ पाठिंबा दर्शविल












