खांबाळे येथे अवैध दारूसह एकावर गुन्हा; ४ हजारांचा मुद्देमाल जप्त

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे मोहितेवाडी येथे अवैधरित्या दारू बाळगल्याप्रकरणी दर्शन चंद्रकांत पवार (रा. खांबाळे, भुतडवाडी) याच्याविरुद्ध वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून सुमारे ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.वैभववाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांचे पथक खांबाळे भुतलवाडी येथे गेले. तेथे एका घराच्या आडोशाला दर्शन पवार हा हातात पिशवी घेऊन बसलेला आढळला. पोलिसांनी संशयावरून त्याची चौकशी व झडती घेतली असता पिशवीत सीलबंद दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
पोलिसांनी पंचनामा करून दारूचा साठा जप्त केला आणि दर्शन पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोहन राणे, शैलेश कांबळे, हरीश जायभाय, श्री. निकम व श्री. हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!