बीडीओ अजिंक्य सावंत, गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला सादर

जिल्हा प्रशासनाची कारवाई

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणुकीच्या अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील कामकाजातः निष्काळजीपणा दाखवणे दोन अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. दोडामार्गचे बीडीओ अजिंक्य सावंत आणि मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांच्यावर शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तरतुदींनुसार ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ६ जुलैला दोडामार्ग तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा केला होता. वझरे गावात झाडे पडून सुमारे ३० घरांचे नुकसान झाले होते, मात्र या दौन्यादरम्यान गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत हे अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत धोकादायक झाडे तोडण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना देऊन पाठपुरावा करण्याचे आदेश सावंत यांना देण्यात आले होते, परंतु त्यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. याशिवाय, दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात झालेल्या विशेष सखोत पुनरिक्षण निवडणूक आढावा बैठकीलाही ते जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिले. या गंभीर हलगर्जीपणामुळे सावंत यांच्या निलंबनाची शिफारस ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे.

दुसरीकडे, मालवणचे विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्यावरही अशीच कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. माने यांची सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मालवण येथील निवडणूक आढावा बैठकीला सर्व संबंधित अधिकान्यांना उपस्थित राहण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते. मात्र, संजय माने हे जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या महत्त्वपूर्ण बैठकीता अनुपस्थित राहिले. निवडणूक कामातील या बेजबाबदारपणामुळे जिल्हा प्रशासनाने माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याची शिफारस सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. अतिशय महत्त्वाच्या शासकीय कामात हलगर्जीपणा करणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांवरील कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!