कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत सध्या इयत्ता नववी मध्ये शिकत असलेला कुमार गौरांग अरविंद सावंत याने उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गटात २३ वा क्रमांक प्राप्त करून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्याच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेतात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २०० गुण प्राप्त केले आहेत.
या विद्यार्थ्याला प्रशालेतील शिक्षक आर्. एन्.भानुसे,साटम एम्. एम्., हाटले पी. एल्.,सावंत ए. ए.,एस्. एम्. न्हिवेकर,पी. एन्. मसुरकर, एम्. पी. मेस्त्री या शिषकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल गौरांगचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर्. एच्.सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण , प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आजी -माजी विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









