नरडवे नं. 1 चे उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सुशांत मर्गज यांची आकाशवाणीवर मुलाखत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात यावर्षीचा म्हणजेच सन 2026 चा उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरडवे नं. 1 तालुका कणकवली चे शिक्षक सुशांत सुभाष मर्गज यांना जाहीर झाला आहे. गेली 19 वर्ष शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुशांत मर्गज यांची उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. या बद्दल त्यांची आकाशवाणी सिंधुदुर्ग वर मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. आकाशवाणी सिंधुदुर्ग येथे सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता 103.6MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग या केंद्रावर मुलाखत संपन्न होणार आहे.

खालील लिंक वरही सदर मुलाखत पाहू शकता.

आकाशवाणी सिंधुदुर्ग
https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=182

Youtube वर पाहण्यासाठी
https://youtube.com/@akashvanisindhudurgnagari?si=liJVERKGpL7rWijL

शैक्षणिक व व्यावसायिक अनुभव

  1. शिक्षकी पेशाची सुरुवात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा जवळेथर तालुका राजापूर44 दिवस, त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पाचल नं.1 तालुका राजापूर, 5 वर्षे 10 महिने 29 दिवस
  2. सध्या कार्यरत शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरडवे नं .1 तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग 13 वर्ष 3 महिने
  3. शैक्षणिक कामकाज ज्ञानी मी होणार सन 2019/ 20 कणकवली तालुक्यात प्रथम, ज्ञानी मी होणार सन 2024 25 25 कणकवली तालुक्यात प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय दरवर्षी ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षेचा निकाल 100 %, सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा, ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा दरवर्षी 100 %निकाल अनेक विद्यार्थी मेडल धारक, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी राज्य, जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यशस्वी, क्रीडा स्पर्धेमध्ये कणकवली तालुक्यामध्ये गुणवत्ता धारक ठरवून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग,
  4. शैक्षणिक उठाव 6 लाख 50 हजार पेक्षा जास्त शैक्षणिक उठाव
  5. 3 री पुनर्रचित अभ्यासक्रम, 2 री पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यवर्धन, शाळा व्यवस्थापन समिती यासारख्या विविध प्रशिक्षणांमध्ये तालुकास्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज
  6. ग्रंथलेखन १. सुंदर सुविचार संग्रह प्रकाशन 2. आदर्श बाल इंग्रजी शब्दकोश प्रकाशन 3. अनेक पुस्तके मासिके हस्तलिखित यामध्ये कविता लेख चित्र प्रकाशित
  7. गुणवत्ता विकास कार्य शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, डिजिटल साधनांचा अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर, अध्ययन अध्यापनात AI तंत्रज्ञानाचा वापर, वाचन कट्टा, परिसरभेट, मेकिंग स्पेलिंग इंग्रजी विषयाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग, स्पर्धा परीक्षांसाठी ज्यादा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन,
  8. मान. शिक्षणाधिकारी प्राथमिक, तसेच माननीय प्राचार्य डाएट सिंधुदुर्ग यांचे 100% शाळा प्रगत अभिनंदन पत्र, 100% पट नोंदणी, ऑनलाइन उपक्रम सहभाग, अध्ययनिक निष्पत्ती विकसित करण्यात उपक्रमांचे आयोजन, शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत सहभाग आणि बक्षीस पात्र, तंबाखुमुक्त शाळा, उल्हास नव साक्षरता उपक्रमात शाळेचा सहभाग
  9. उत्कृष्ट शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल 12 वर्षे अ + अत्युत्कृष्ट गोपनीय शेरा
  10. प्रशाळेत संगणक, लॅपटॉप, प्रोजेक्टर चा वापर करून डिजिटल अध्ययन अध्यापनास प्रोत्साहन
  11. सेंद्रिय परिस बाग बळीराजासाठी एक दिवस, एक पेड मा के नाम उपक्रमात सहभाग
  12. २ वेळा जनगणना राष्ट्रीय कार्यात सहभाग
  13. शैक्षणिक संशोधन पर निबंध कृती संशोधन प्रकल्प – वाचन कौशल्यातील समस्या शैक्षणिक प्रकल्प- भाषा विकासाच्या वाचन लेखन कौशल्याचा विकास करणे, इंग्रजी शब्द वाचन लेखनाची आवड निर्माण करणे सादरीकरण
  14. सामाजिक कार्यात सहभाग युवा संदेश प्रतिष्ठान चे सदस्य, प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात सहभाग
  15. *सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा स्पर्धाप्रमुख दरवर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 विद्यार्थ्यांना मोफत विमानासह इस्रो दौऱ्याचे आयोजन युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात येते.
  16. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा कणकवली तालुकाध्यक्ष संघटनेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

आत्तापर्यंत प्राप्त पुरस्कार

  1. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सन 2026/ 27
  2. रत्नागिरी तालुका कला अध्यापक संघ रत्नागिरी कृतिशील कलाशिक्षक पुरस्कार २००७-८
  3. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा उपक्रमशीलता गौरव सन्मान २००९-१०
  4. रत्नागिरी जिल्हा परिषद सावित्रीबाई फुले पुरस्कार 2012- 13
  5. सिद्धी ट्रस्ट देवरुख यांचा प्रकल्प प्रमुख पुरस्कार 2012- 13
  6. शिवाई मित्र मंडळ नरडवे पुरस्कर आदर्श शिक्षक पुरस्कार 2016- 17
  7. युवा संदेश प्रतिष्ठान पुरस्कृत आदर्श शिक्षक पुरस्कार 2017- 18
  8. अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ यांचा सन्मान 2017-18
  9. जि प सिंधुदुर्ग चा मुलींच्या उत्कृष्ट पट नोंदणी पुरस्कार 2018- 19
  10. रोटरी क्लब कणकवलीचा नेशन बिल्डर अवॉर्ड 2021- 22
  11. ग्रामपंचायत नरडवे कोरोना योद्धा सन्मान 2021- 22
  12. आज संस्थेचा राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार 2023-24
  13. नरडवे केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024-25
  14. वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट सन्मान 2025 -26
  15. दिगवळे गावठाण वाडी विकास मंडळ यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025- 26
error: Content is protected !!