तिरवडे तर्फ खारेपाटण येथील ग्रामस्थांनी एकत्र येत बांधला वनराई बंधारा

वैभववाडी (प्रतिनिधी) : तिरवडे तर्फ खारेपाटण येथील ग्रामस्थांनी एकत्र येत गडनदीवर माठाची कोंड येथे वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे गावातील पाणी पातळीत वाढ होणार आहे.

यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्हात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरावा मोहीम पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन राबवीत आहे. त्याचाच भाग म्हणून तालुक्यात गावागावात वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत

तिरवडे ग्रामस्थांनी श्रमदानं करून बंधारा बांधला आहे. यावेळी सरपंच जितेंद्र तळेकर, उपसरपंच सुनीता सावंत, तंटामुक्त अध्यक्ष दीपक कांबळे, संतोष तळेकर, सुहास गुरव प्रल्हाद पावले प्रिया पावले मानसी घोगरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

error: Content is protected !!