वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : आंबोली वनविभगाातील केसरी बिट येथील वनरक्षक अश्लेषा सागर मांगले (मुळ आजरा) हिला लग्नाचे आमिष दाखवून फेवणूक केली. तसेच यूतीच्या आत्महत्येनंतर मोबाईलमधील डाटा डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवसू येथील वनरक्षक सनिकेत सतीश पाटील (वाळवा, जि. सांगली) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

अश्लेषा व सनिकेत यांचे प्रेमसंबंध होते. त्याने अश्लेषाला लग्नाचे वचन दिले होते. याबाबत आश्लेषाने १२ ऑगस्ट रोजी गावी गेली असता आपल्या आईला सांगितले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आपल्या आईशी नेहमीप्रमाणे बोलणे झाले होते. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दु. ३ वा.पुर्वी अश्लेषा हीने माडखोल धवडकी येथील राहत असलेल्या भाड्याच्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर आरोपी त्याठिकाणी पोहोचला. घरमालक श्री. गोवेकर व बाजूच्या डॉक्टर श्री. चव्हाण यांना कल्पना न देता त्याने अश्लेषाला गळफास सोडवून खाली घेतले. तीच्या मोबाईलमधील व्हॉटस्अप चॅट व इतर डाटा डिलीट केला.

याबाबत तीचे वडिल सागर मांगले यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देत लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार दिल्याच्या नैराश्येतून तीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. त्यानुसार भा.न्या.सं. १०८, २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत आरोपीने सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने २५ हजारांचा अटक पुर्व जामिन मंजूर करताना पोलीसांना तपासात सहकार्य करावे, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फिर्यादींशी संपर्क साधू नये आदी अटी घातल्या आहेत.

error: Content is protected !!