झुंझार मित्र मंडळ खारेपाटण चे काम कौतुकास्पद – नितेश राणे
खारेपाटण (प्रतिनिधी) : झुंझार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण शिवाजी पेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्र उत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी शुक्रवार दि.१६ रोजी रात्री ११ वाजता सदिच्छा भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी झुंझार मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी त्याचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी त्यांच्यासमवेत भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल, श्री प्रवीण लोकरे,नंदकिशोर कोरगावकर, भाऊ राणे, बूथ अध्यक्ष शेखर शिंदे, झुंझार मित्र मंडळ खारेपाटण चे कार्यकर्ते महेश कोळसुलकर, दिगंबर राऊत, संकेत लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवरात्रोत्सव निमित्त झुंझार मित्र मंडळाच्या वतीने खारेपाटण बाजारपेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून मंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह देवी दुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी झुंझार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने अध्यक्ष संकेत शेट्ये यांच्या शुभहस्ते मंत्री नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या वतीने खारेपाटण एस. टी बस स्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला दशाअवतार कार्यक्रमाला देखील मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली.
“झुंझार मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये व त्यांचे सहकारी कार्यकर्ते सुंदर अशा नवरात्रोत्सव उत्सवाचे आयोजन खारेपाटण येथे करत असून या निमित्ताने मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेले सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आणि कार्यक्रम निश्चितच चांगले असून या मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे भावपूर्ण उदगार मंत्री नितेश राणे यांनी यावेळी काढले.
दरम्यान खारेपाटण येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित खारेपाटण बस स्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला दशावतार कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी पाहून नितेश राणे भारावून गेले. व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे चांगले कार्यक्रम घ्यावेत असे सांगून संपूर्ण नवरात्रोत्सव कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.












