झुंझार मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सनिमित्त भव्य ढोल वादन स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण एसटी स्टँडवर 17 ऑक्टोबर रोजी रंगणार ढोलवादन स्पर्धा

खारेपाटण (प्रतिनिधी) : झुंझार मित्रमंडळ खारेपाटणच्या वतीने नवरात्रोत्सनिमित्त भव्य ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खारेपाटण एसटी स्टँडवर 17 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता  ढोलवादन स्पर्धा संपन्न  होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पथकाला २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या पथकाला १० हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला प्रत्येकी २ हजार रुपये वाहनभाडे देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

ढोलवादनातील ताल, लय, शिस्त, एकसंधता आणि सादरीकरणातील जोश यामुळे ही स्पर्धा रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. विविध ढोलपथकांच्या सादरीकरणातून खारेपाटण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, नवरात्रोत्सवाच्या आनंदात या स्पर्धेमुळे आणखी भर पडणार आहे.

या भव्य ढोलवादन स्पर्धेत जास्तीत जास्त ढोलपथकांनी सहभागी व्हावे, तसेच नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन झुंजार मित्र मंडळ, खारेपाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी महेश कोळमसुलकर (८३२९०८४०३०) आणि दिगंबर राजस्त (९४२३८३३३४६) यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!