तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयामध्ये गुरुवारी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर तर दीपप्रज्वलन सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, सदस्य डॉ. अभिजित कणसे, डॉ. हेमंत महाडिक, ध्रुव बांदिवडेकर, निलेश सोरप, राजेश जाधव, श्रावणी मदभावे, सतीश मदभावे, देवकी तळेकर, राजेश जाधव, ग्रंथपाल साक्षी तळेकर, मदतनीस नेत्रा पावसकर आदी उपस्थित होते.
यावेळी वाचनालयाला माजी सभापती दिलीप तळेकर यांनी 3500 किंमतीची 10 पुस्तके वाचनालयाला भेट दिली. यावेळी अनेक मान्यवरांनी वाचनालयाचे महत्व सांगताना वाचनालयात या आणि उत्तमोत्तम साहित्यिक असलेली पुस्तकांचे वाचन करा. वाचलात तर वाचाल असे सांगतानाच वाचनालय आपल्याला साद घालत असल्याचे सांगितले.
पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद
यानिमित्त आयोजित केलेल्या नवीन खरेदी केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचनालयात नवीन खरेदी केलेले पुस्तकांची ओळख वाचकांना व्हावी यासाठी या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राजू वळंजू, मिनेश तळेकर,, डॉ. हेमंत महाडिक, श्रावणी मदभावे, राजेश जाधव, चंद्रकांत तळेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिनेश तळेकर तर आभार चंद्रकांत तळेकर यांनी मानले.












