वैभववाडीत कै.हेमंत केशव रावराणे विद्यालयाचे एच.एस.सी परीक्षेत वर्चस्व कायम

वाणिज्य शाखेतील विद्यार्थी कु.अनिकेत संतोष कुलकर्णी 88.17% मिळवून तालुक्यात प्रथम

कनिष्ठ महविद्यालयाचा एचएससी निकाल 99.18%

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे एकूण 246 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते तर 2 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिल्याने 244 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणून महविद्यालयाचा एचएससी शेकडा निकाल 99.18% लागला आहे. महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी अनिकेत संतोष कुलकर्णी याने 88.17% गुण मिळवत महाविद्यालयात वाणिज्य शाखेत तसेच वैभववाडी तालुक्यात एचएससी परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. शिवाय विद्यालयाची विद्यार्थिनी मनस्वी दिलीप शिंदे हिने कला शाखेतून 86.33% गुण मिळवत व स्वरुपा सुधाकर येवले हिने विज्ञान शाखेत 79.33% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे.

विद्यालयाचा शाखानिहाय निकाल पुढीप्रमाणे

प्रशालेचा शाखा निहाय निकाल

कला शाखा
परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी – 60
उत्तीर्ण विद्यार्थी -60
गैरहजर विद्यार्थी – 0
शेकडा निकाल – 100%🏆

अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक –
1- कु.मनस्वी दिलिप शिंदे. (518) 86.33%
2- कु.बोडेकर हर्षदा शिवाजी (484) 80.67%
3- कु.लावण्या विठ्ठल काळे. (457) 76.17%

वाणिज्य शाखा
परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी – 88
उत्तीर्ण विद्यार्थी – 87
गैरहजर विद्यार्थी – 01
शेकडा निकाल – 98.86%

अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक –
1-कु.अनिकेत संतोष कुलकर्णी (529)88.17%
2-कु.वैष्णवी औदुंबर तळेकर ( 518) 86.33%
3-कु.समाधान रमेश सुतार (488) 81.33%

विज्ञान शाखा
परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी – 98
उत्तीर्ण विद्यार्थी -98
गैरहजर विद्यार्थी – 01
शेकडा निकाल – 98.97%

अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक –
1-स्वरूपा सुधाकर येवले. (476)79.33%
2-पार्थ सचिन क्षीरसागर. (461)76.83%
3-हार्दिक संदीप शिंदे. (433)72.17%
एच.एस.सी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी – पालक, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे व कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे मुख्याध्यापक नादकर सर यांनी अभिनंदन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!