कै.सौ. उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांंसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.सौ.उमा महेश काणेकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांंच्या सृजनशीलतेला आणि आंतरिक लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, कलातपस्वी आप्पा काणेकर यांनी आपले समग्र जीवन कलेसाठी समर्पित केले होते,त्यांच्या कलासहयोगाच्या स्मृती सदैव जागत्या ठेवाव्यात या उदात्त हेतूने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे, दरम्यान त्यांची सहचारिणी ट्रस्टच्या विश्वस्त उपक्रमशील शिक्षिका उमा काणेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, कै.उमा काणेकर यांच्या शैक्षणिक योगदानाची प्रेरणा नव्या पिढीतील विद्यार्थी शिक्षकांना मिळावी यासाठी गतवर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे, याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून स्मृतीशेष सौ.उमा काणेकर यांना वैशिष्टयपूर्ण उपक्रमांतून आदरांजली वाहण्यातयेत आहे. यावर्षी, कै.उमा महेश काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ खालील स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

निबंध स्पर्धा

▪️गट-पहिला ५ वी ते ७ वी
१) प्रदूषण रोखण्यासाठी मी केलेले उपाय
२) स्वच्छता अभियानातील माझा सहभाग
३) मी प्राण्यांवर असे प्रेम करतो
(शब्द मर्यादा-२००ते २५०)

▪️गट दुसरा-८ वी ते १० वी
१) अंधश्रद्धा निर्मूलन आणि आजची पिढी
२) भारतीय संविधान आणि समता
३) वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हे व्हायलाच हवे
( शब्द मर्यादा ४०० ते ४५०)

▪️गट तिसरा-महाविद्यालयीन
१) लोकशाही टिकली तर देश टिकेल
२) प्रसार माध्यमे आणि समाज
३) माझा मताधिकार
(शब्द मर्यादा- ६५० ते ७००)

▪️प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंधलेखन स्पर्धा
१) माझी विद्यार्थीकेंद्रित अध्यापनपद्धती
२) विज्ञानातील प्रयोग आणि माझे विद्यार्थी

( प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक स्पर्धेत भाग घेऊ शकतात. सदर स्पर्धेसाठी किमान पाच हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेणे आवश्यक आहे.तरच स्पर्धकांचे गुणांकन केले जाईल याची नोंद घ्यावी)

विजेत्या स्पर्धकांना नियोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले निबंध खालील पत्त्यावर दिनांक २७ डिसेंबर २०२३ पूर्वी पाठवावेत कल्पना मलये (9673438239) जि.प.शाळा कणकवली क्र. ५ शिवाजी नगर कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग अधिक माहितीसाठी संपर्क राजेश कदम 9423832692/7057383982 यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेऊन कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या स्तुत्य उपक्रमाला सहयोग द्यावा असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!