जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच,दाभोली,वेंगुर्ला चे आयोजन

मसुरे(प्रतिनिधी) : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने महिला शाळा व्यवस्थापन समिती आणि माता-पालक समितीवर सदस्य किंवा पदाधिकारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शाळा व्यवस्थापन समिती मद्ये कार्य करत असताना या महिलांना विचार व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, पुढे त्यांनी यातून सामाजिक क्षेत्रामध्ये ,राजकीय आणि विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवावा, हा सदर निबंध लेखन स्पर्धेमागील उद्देश आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक, माध्यमिक अनुदानित – विनाअनुदानित सर्व शाळा मधील शाळा व्यवस्थापन व माता – पालक समिती महिला सदस्यासाठी सदर स्पर्धा खुली आहे.निबंध लेखनासाठी ‘मोबाईलचे दुष्परिणाम – आई-बाबांसोबत तुटलेला संवाद’ हा विषय असून किमान ७०० तर कमाल १००० शब्दांमध्ये महिलांनी आपले मत सबंधित विषयावर मराठी भाषेत व्यक्त करायचं असून सोबत समिती सदस्य असल्याबाबत शाळेचे शिफारस पत्र जोडणे अनिवार्य आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये १०००, ७००, ५००, २५०, २५० प्रत्येकी चित्रफ्रेम, प्रमाणपत्र आणि मेडल आणि सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर निबंध कागदाच्या एका बाजूला स्व:हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस; द्वारा प्रा.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, ता:वेंगुर्ला ,जिल्हा: सिंधुदुर्ग, पिन-४१६५१५ या पत्त्यावर दिं. २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत पाठवायचे आहेत.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!