कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला असून ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा बारावीचा निकाल 100% लागला असून एकूण 95 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. विज्ञान शाखेत विशेष प्रविण्यासह विद्यार्थी, प्रथम श्रेणीत विद्यार्थी, द्वितीय श्रेणी विद्यार्थी,तृतीय श्रेणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 90% च्यावर विद्यार्थी आहेत. वाणिज्य शाखेत विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते विशेष प्राविण्यासह विद्यार्थी, प्रथम श्रेणीत विद्यार्थी, तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये,उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सहसचिव प्रा.निलेश महेंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, सल्लागार डी. पी.तानावडे,शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.
विज्ञान शाखा पहिले पाच विद्यार्थी : प्रियांका आनंद पारकर 87 टक्के,सनिल राजेश माेरे 82.50 टक्के,अद्वेय किरण गुजर 80.83,श्रेयश शशिकांत गाेठणकर 78.67 टक्के, चैतन्य संताेष केळकर 77.50 टक्के,
वनिज्य शाखा – दिक्षा दिपक कुबल 72.33 टक्के,आदित्य रुपेश पटेल 71.83 टक्के, प्रिती रामचंद्र दळवी 69 टक्के