न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य व कला शाखेचा १००% निकाल….!

मुलींनी मारली बाजी, वर्चस्व केले सिध्द

आचरा (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचा वाणिज्य आणि कला शाखांचा निकाल 100% लागला असून यशाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य विभागात 84 विद्यार्थी परीक्षेला बसले होते या पैकी सर्वच्या सर्व म्हणजे 84 विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल 100 लागला. यामध्ये, कु. प्रणिता शत्रुघ्न आईर 89.50%(537) गुण प्राप्त करत-प्रथम, कु. दिक्षिता मनोहर पाताडे 86.83%(521)गुण प्राप्त करत-द्वितीय, कु. दर्शना सुनिल परब 86.67%(520) गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला.तसेच कला(आर्टस् )विभागात एकूण 32 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल 100% लागला. यामध्ये कु. ज्योती गणेश जाधव 81.83%(451) गुण प्राप्त करत-प्रथम, कु. तेजल महादेव बागडे 76.50%(459) गुण प्राप्त करत-व्दितीय, कु. अर्पिता महेश हडकर 70.67%(424) गुण प्राप्त करीत-तृतीय क्रमांक प्राप्त केला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष निलिमा सावंत, सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!