वक्तृत्व स्पर्धेसह व १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि निवृत्त ग्रामस्थ यांचा जीवन गौरव पुरस्कार संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : असलदे बौद्ध विकास मंडळ मुंबई व माता रमाबाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजगृह महाबोधी बुद्ध विहार नाहूर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दीन अर्थात अशोका विजया दशमी उस्ताहात साजरा करण्यात आली. राजगृह महाबोधी बुद्ध विहार नाहूर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी दीप प्रज्वलन अध्यक्ष धर्मेंद्र तांबे प्रमुख पाहुणे प्रवचनकार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माता रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष सुषमा तांबे यांनी गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर येथील बुद्धविहारात असलदे बौद्ध विकास मंडळ यांचे सभासद आणि बौद्धचार्य सुनील गुणाजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक त्रिसरण पंचशील बौद्ध धम्म पूजा पाठ घेण्यात आला.यामध्ये सर्व बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला.यानंतर धम्मचक्र परिवर्तन दिनाचे महत्त्व समजावून घेण्यासाठी प्रवचनकार अशोक विजयादशमी या विषयावर व्याख्याते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यानंतर ज्या सभासदांनी समाजासाठी आपले आयुष्य वेचले आहे त्या व्यक्तींचा निवृत्त व जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यानंतर प्रतिवर्षी प्रमाणे १०आणि १२ गुणवंत विद्यार्थांचा मान्यवरांचा शुभहस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष धर्मेंद्र तांबे, सचिव तेजस तांबे, उप सचिव धीरज तांबे अनिल तांबे, राजेंद्र तांबे, संतोष तांबे, दिपक तांबे, जयू तांबे, शशिकांत तांबे, गौतम तांबे, प्रदिप तांबे, मुकेश तांबे, राजेंद्र तांबे, विकास तांबे, संदेश तांबे, निखिल तांबे, तुषार तांबे, रमेश तांबे, संजय तांबे, भूषण तांबे, अनुर, यश, वेदांत, प्रांश, अर्णव, अध्यक्ष सुषमा तांबे, जान्हवी तांबे, शितल तांबे, रोहिणी तांबे, रेणुका तांबे, सीमा तांबे, दीप्ती तांबे, मंदा तांबे, छाया तांबे, सान्वी तांबे, मोहिनी तांबे, दिपीका तांबे, पूजा तांबे, मृणाली तांबे, सिंधू तांबे, सृष्टी तांबे, वैभवी तांबे, विदिशा तांबे, अधिरा तांबे, अद्विता हाटे सायली तांबे यांचा उपस्थित उस्ताहात साजरा करण्यात आला यावेळी सूत्रसंचलन मृणाली तांबे आणि तेजस तांबे यांनी आभार मानले
फोटो –











