खारेपाटण येथील दीपावली बाजाराची धूमधडाक्यात सुरवात

“विकासाच्या प्रक्रियेत खारेपाटण चकचकीत झालेले दिसेल” – आमदार निलेश राणे

खारेपाटण (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील होतकरू महिला बचतगटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण येथे भरविण्यात आलेल्या भव्य दीपावली बाजाराचे उद्घघाटन आज रविवारी सायं.६ वाजता शिवसेना पक्षाचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

दि.१ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खारेपाटण एस टी बस स्थानक समोरील पटांगणात भरविण्यात आलेल्या या “भव्य बचतगट दीपावली महोत्सव २०२६ ” च्या शुभारंभ प्रसंगी शिवसेना नेते संजय आंग्रे, सिंधुदुर्ग जि.प.समाज कल्याण सभापती सौ रुहिता तांबे,देवगड उपसभापती, केळवली जि.प सदस्य श्री सूद साहेब,पं.स.बंड्या मोहरकर,शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख अशपाक हाजू,पराडकर,पं.स सदस्य गुरुप्रसाद शिंदे,श्री वायगणकर,सुहास राऊत,खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत,भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,मधुकर शेठ गुरव,प्रवीण लोकरे,भाऊ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

“खारेपाटण मधील आमचे कार्यकर्ते मंगेश गुरव आणिंत्यांचे सहकारी दरवर्षी दिवाळी बाजार भरवून येथील बचत गटाच्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे.ही बाब कौतुकास्पद असून ज्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतला त्याचे अभिनंदन करतो.मात्र खारेपाटण न येथील गावात येणारा मुख्य रस्ता ही मोठी समस्या असून मी यासाठी निश्चित प्रयत्न करेन पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या मतदार संघात ज्याप्रमाणे विकास केला आहे तसाच ते खारेपाटणमध्ये करतील व लवकरच खारेपाटण चा चांगला चकचकीत विकास झालेला तुम्हाला दिसेल असे यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले. “

पुढे बोलताना आमदार निलेश राणें म्हणाले सध्या राज्यातील दुष्काळाची परस्थिती लक्षात घेता आपण खारेपाटण गावात पाणी टंचाई होऊ नये बंधाऱ्याचे काम हाती घ्यावे.तसेच खारे व गोडे पाणी बंधारा बांधून वेगळे करण्याचे नियोजन करा त्यासाठी लागणारा निधी आपण.निश्चित उपलब्ध करून देऊ असे देखील मार्गदर्शन करताना सांगितले.

दिवाळीच्या मुहूर्तावर दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं.५.०० वाजता या भव्य दीपावली बाजाराचे उद्घघाटन शिवसेना नेते तथा आमदार निलेशजी राणे यांच्या शुभ हस्ते होणार असून शासनाच्या महिलासक्षमीकरण उपक्रमाला हातभार लावत ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ मिळावी, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळावी आणि महिला बचतगटांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, हा या दीपावली बाजार महोत्सवा मागील प्रमुख हेतू असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी शिवसेना नेते संजय आंग्रे,रत्नागिरी जि.प सदस्य श्री सूद ,देवगड सभापती लोके,समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांनी आपली मनोगते व्यक्त केली व दिवाळी बाजाराला शुभेच्छा दिल्या.तर या दीपावली बाजारामध्ये बचत गटांच्या महिलांच्या वतीने एकूण २० स्टॉल लावण्यात आले होते.यामध्ये दिवाळीचा फराळ, आकाशकंदील,शोभेच्या वस्तू, दिवे,मेणबत्त्या,पणत्या,रांगोळी तसेच घरगुती वापरातील विविध दर्जेदार उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध झाल्या होत्या. यावेळी आमदार निलेश राणे यांनी महिलांशी संवाद साधत सर्व बचत गट स्टॉल ला भेटी दिल्या दिवाळी बाजाराची पाहणी केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी मानले.

error: Content is protected !!