कणकवली (प्रतिनिधी) : ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, रेल्वे स्टेशन कणकवली आयोजित रिक्षा चालक मालक मर्यादित भव्य खुली नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026 – वर्ष 2 रे या स्पर्धेला युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री. विजय मऱ्याप्पा इंगळे यांनी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोषजी सावंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विजय इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
रिक्षा चालक-मालक हा दिवसभर कष्ट करणारा वर्ग आहे, त्यांच्या मनोरंजनासाठी व एकोप्यासाठी अशी क्रीडा स्पर्धा आयोजित करणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. रिक्षा चालकांच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसेना व युवासेना सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे मत यावेळी विजय इंगळे यांनी व्यक्त केले.
यावेळी चिंटू चव्हाण, महेश कदम, विशाल इंगळे, लवेश पांचाळ, महेश नन्नवरे व सर्व चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.












