किशोर/ किशोरी जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा जामसंडे देवगड येथे….

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणारी किशोर/ किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जामसंडे हायस्कूल देवगड येथे देवगड तालुका कबड्डी असोसिएशन व सन्मित्र मंडळ जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे .अशी माहिती सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष अंड. अजितराव गोगटे यांनी प्रसिद्धीस दिली आहे .याप्रसंगी देवगड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष धुरी, पदाधिकारी चंदू पाटकर, सन्मित्र मंडळ जामसंडे अध्यक्ष राजा भुजबळ, जिल्हा पंचमंडळ अध्यक्ष प्रशांत वारीक आदी मान्यवर उपस्थित होते .या स्पर्धेत किशोर /किशोरी संघ सहभागी करण्यासाठी प्रत्येक तालुका कबड्डी असोसिएशन ने पुढाकार घेऊन आपापल्या तालुक्यात तातडीने मैदान चाचणी घ्यावी व किशोर गटाचे २ संघ व किशोरी गटाचे २संघ निवडावेत. हे ४ संघ जामसंडे देवगड येथे होणाऱ्या किशोर /किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत आपल्या तालुक्याच्या शिफारशी सहित सहभागी करावेत. परंतु तालुका कबड्डी असोसिएशनच्या मैदान निवड चाचणीमध्ये सहभागी होणारे संघ व खेळाडू मात्र आपापल्या स्थानिक मंडळाच्या,शालेय संघांच्या / संस्थांच्या माध्यमातून तालुका कबड्डी असोसिएशनच्या शिफारसीने सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन ला संलग्न असणे बंधनकारक आहे. याकरिता जिल्हा संघटनेचा विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संबंधित संघांकडून भरून घ्यावा. १६ वर्षाखालील किशोर /किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख किशोर गट १३/१२/२०१० व त्यानंतरची आणि वजन ६० किलो तर किशोरी गट जन्मतारीख ३१/१२/२०१० व त्यानंतरची आणि वजन ५५ किलो आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी वयाच्या दाखल्याबाबत पुरावा म्हणून १) दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या खेळाडूंनी परीक्षा हॉल तिकिटाची रंगीत छायांकित प्रत द्यावी.२) यावर्षी दहावी व बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरल्यानंतर प्री लिस्ट ची प्रत मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीनिशी द्यावी.३) माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी खेळाडूंसाठी शाळेचा यु-डायस नंबर व स्टुडन्ट आयडी असलेल्या बोनाफाईड व निर्गम उताऱ्यावर खेळाडूच्या फोटोवर मुख्याध्यापकाने अर्धसाक्षांकित केलेले असावे.४) इयत्ता पहिली प्रवेश घेतल्याचा निर्गम उतारा ५) आर.टी.ई.२००९ प्रमाणे प्रवेश घेतला असल्यास प्रथम प्रवेश घेतलेल्या शाळेचा यु-डायस व स्टुडन्ट आयडी असलेला निर्गम उतारा किंवा टीसी ची छायांकित प्रत )६)संबंधित खेळाडूचे वय, १ किंवा ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला.७)संबंधित खेळाडूंच्या वयाची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल तर खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टर ची सत्यप्रत अनिवार्य राहील.यावरील पैकी एका जन्मपुराव्या सोबत खालील एक कागदपत्र असणे अनिवार्य आहे.१)आधार कार्ड ची रंगीत छायांकित प्रत व मूळ प्रत.(आधार कार्ड अद्यावत केलेले असावे यामध्ये जन्मतारखेची तारीख/ महिना/ साल स्पष्ट उल्लेख असावा) आपापल्या तालुक्याच्या संघांची संघनिश्चिती प्रवेश अर्जासहित दिनांक ६ नोव्हेंबर दुपारी २ वाजेपर्यंत पर्यंत आयोजकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

जिल्ह्याचे निवडलेले दोन्हीही किशोर / किशोरी संघ १९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत परभणी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत .अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन कार्यवाह /सहकार्यवाह यांच्याशी त्वरित संपर्क करावा तर संघ निश्चिती करीता स्पर्धा संयोजक श्री सुभाष धुरी ९४२३३०३८३७ यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!