लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्ता कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन

लांजा (प्रतिनिधी) : लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. या कामामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, रस्त्याची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

यावेळी मंडळ अध्यक्ष विराज हरमले, शैलेश खामकर, प्रभाकर टोले, प्रमोद कुरुप, शेखर सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!