कणकवली (प्रतिनिधी) : दीपावलीनिमित्त संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे ७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता कलमठ बाजारपेठ येथे श्रीकृष्ण वेशभूषा व नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे ६०००० रु. व सन्मानचिन्ह, ४००० रु. व सन्मानचिन्ह, २००० रु. व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रत्येक १००० रु. व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेत सहभागी होणाºया संघांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी तेजस लोकरे (९४२२१७९५९६), नितीन पवार, सचिन वाघेश्री यांच्याकडे संपर्क साधावा, स्पर्धेत जास्तीत संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
कलमठमध्ये ७ रोजी नरकासुर स्पर्धा












