ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या १३ जागांसाठी १७ अर्ज प्राप्त झाले होते. यातील एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे १३ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. १३ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या असून केवळ तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी ३ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सिंधुदुर्गनगरी येथील ग्रामसेवक भवन येथे मतदान प्रक्रिया राबविली जाणार असून यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.