खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय संविधान दीन साजरा

महिलाना संविधान प्रस्ताविकेचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय संविधान दीन गुरुवार दि.२६ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच महेंद्र गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, ॲड. क्षितिजा धुमाळे, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आस्था पाटणकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर यांनी भारतीय संविधान दिनाचे महत्व ग्रामस्थांना विषद केले. तर आस्था पाटणकर यांनी भरतोय संविधान दिनाची माहिती उपस्थिताना दिली. तसेच ग्रामपंचायत सदस्य क्षितिजा धुमाळे यांनी भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलाना देण्यात आलेले हक्क व अधिकार याविषयी माहिती दिली.

भारतीय संविधान दिनानिमित्त खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित महिला व ग्रामस्थ यांना भारतीय संविधान प्रास्ताविकेचे फोटो भेट स्वरूपात देण्यात आले. शेवटी सरपंच महेंद्र गुरव यांनी भारतीय संविधान दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा देत डॉ.बाळासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

error: Content is protected !!