वैभववाडीत उद्या श्री सत्यनारायण महापूजा

महाकाली अघोरी नृत्याचे विशेष आकर्षण

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील श्री अदिष्टी देवी मंदिरात शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून रात्री ९.३० वाजता महाकाली अघोरी नृत्य सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील भाविकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.

श्री अदिष्टी देवी मंदिर, वाभवे-वैभववाडी येथे हा कार्यक्रम होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!