मच्छिमार बांधवांसाठी ७ डिसेंबरला वेंगुर्ल्यात विशेष जनजागृती कार्यक्रम..!

राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार नोंदणी; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग होणार सुकर

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : मच्छिमार बांधवांना केंद्र शासनाच्या विविध मत्स्य व्यवसाय विषयक योजनांचा लाभ मिळावा, तसेच त्यांची राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी व्हावी, या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र किर्लोस (सिंधुदुर्ग),लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्ला आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ७ डिसेंबर २०२६ रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वेंगुर्ला शहरातील राजवाडा येथील किरण कुबल यांच्या निवासस्थानी सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मच्छिमार बांधवांना राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्म चे महत्त्व समजावून सांगण्यात येणार असून, प्रत्यक्ष नोंदणीही करून घेण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी केल्यानंतर मच्छिमार बांधवांना स्वतंत्र डिजिटल ओळख मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना (PM-MKSSY) यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध मत्स्य व्यवसाय विषयक योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय मत्स्यपालन विमा प्रोत्साहन आणि संस्थात्मक कर्ज मिळविण्या साठीही या नोंदणीचा उपयोग होणार आहे.

नोंदणीसाठी येताना मच्छिमार बांधवांनी आपले आधार कार्ड, आधार कार्ड शी संलग्न असलेला मोबाईल फोन, बँक पासबुक आणि स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमात मच्छिमारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. त्यामुळे वेंगुर्ला परिसरातील जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी या संधीचा लाभ घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहावे व राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र किर्लोस चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्लाच्या अध्यक्षा सौ. ज्योती प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.

error: Content is protected !!