रेल्वेत चाकूने वार करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी): रेल्वेत चहा विक्रेत्या वर चाकूने वार करणारा आरोपी नौशाद मोईदु कदम थोडी ( वय 56, रा.जुहू मुंबई, मूळ रा केरळ ) याचा जामीन अर्ज जिल्हा प्रधान न्यायाधीश भारुका यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. फिर्यादी दीपक भारत सिंह हे कोकण रेल्वेत वेंडर म्हणून काम करतात. मडगाव हुन लोकमान्य टिळक टर्मिनल्स ला जाणाऱ्या ट्रेन मध्ये आरोपी नौशाद ने चहा विक्रेता फिर्यादी दीपक कडून घेतला. मात्र चहाचे पैसे मागितले म्हणून फिर्यादी दीपक वर चाकूने वार केले. हा गुन्हा 23 एप्रिल 2023 रोजी घडला होता. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी नौशाद ने दाखल केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील देसाई यांनी हरकत घेतली.जिल्हा प्रधान न्यायाधीश भारुका यांनी ऍड. देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी नौशाद चा जामीन अर्ज फेटाळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!