कॉंग्रेसच्यावतीने सानिका सावंत हिचा गौरव

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील सानिका दत्ताराम सावंत या विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत ९३.५०टक्के गुण मिळविले आहेत.या यशाबद्दल कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने तिच्या निवासस्थानी जाऊन गौरव करण्यात आला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,तालुका सरचिटणीस महेश तेली ,शहराध्यक्ष अजय मोरये , तालुका महिला अध्यक्षा अमृता मालंडकर, महिला उपाध्यक्षा आयेशा सय्यद, गौरी तेली,डॉ.प्रमोद घाडीगावकर ,प्रदीपकुमार जाधव ,अमित मांडवकर ,निलेश मालंडकर, अक्षय घाडीगावकर , पंढरी पांगम आदी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!