कु.उत्कर्ष हांडे ९५.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी मार्च – २०२३ बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालयाचा निकाल १०० % लागला असून ९५.४०% गुण मिळवून उत्कर्ष लक्ष्मण हांडे याने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तर ९४.६०% गुण मिळवत कु. दिपराज प्रकाश झोरे याने द्वितीय क्रमांक पटकावला असून ८९.००% गुण मिळवून कु. प्रारब्ध प्रकाश पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
अर्जुन रावराणे विद्यालयामधील एकूण ५६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १०० % लागला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद दत्ताराम रावराणे व कार्याध्यक्ष जयेंद्र दत्ताराम रावराणे तसेच मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.