नवोदित कलाकारांना नावारूपास आणणारी ही वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा ठरेल
चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी आयोजित सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धेचा शुभारंभ
कुडाळ ( अमोल गोसावी ): ” फक्त नविन कलाकार या नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत हे या स्पर्धेच वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा घेऊन नवोदित कलाकार घडवण्याच कार्य चिमणीपाखरं डान्स ॲकॅडमी कडून होत आहे त्याबद्दल रवी कुडाळकर यांच मी कौतुक करतो. यातून एक नविन कलाकार नावारूपास येइल. कला हा जिवनाचा आधारस्तंभ आहे. कलेच्या माध्यमातून मानसिक बौद्धिक विकास होत असतो त्याचा फायदा विद्यार्थ्यांना अभ्यासातही होत असतो. तुम्ही केलेल्या परिश्रमाला निश्चित यश मिळणार आहे. कलाकार घडवणं , त्याच्या कलेला दाद देणं आणि योग्य स्थानापर्यंत त्यांना नेण्याच काम कुडाळकर करत आहेत. दिक्षा नाईक सारखे नृत्यकलेतील हिरे चिमणीपाखरं डान्स ॲकॅडमीने घडवले आहेत. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल भोगटे यांनी चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी प्रस्तुत सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मराठा समाज हॉल कुडाळ येथे बोलताना केले. यावेळी उद्योजक कृष्णा धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि माजी सभापती सुनिल भोगटे आणि मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रायोजक निलेश आळवे प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक विजय सावंत , तुळशीदास आर्लेकर सतिश पावसकर , प्रमोद नाईक , एस. के. डान्स ॲकॅडमीचे सचिन कांबळी, भरतनाट्यम विशारद शुभम धुरी , निलेश गुरव , चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमीचे संस्थापक कोरिओग्राफर रवी कुडाळकर , सिनेमॅटोग्राफर शेखर सातोस्कर , परिक्षक दिक्षा नाईक , निवेदक शुभम धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा चिमणीपाखरं डान्स ॲकॅडमी कडून शाल , पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्पर्धेसाठी उपस्थित विद्यार्थ्यांची ऑडीशन घेण्यात आली. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून रवी कुडाळकर , सचिन कांबळी , शुभम धुरी आणि दिक्षा नाईक हे काम पाहणार आहेत.