आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एसटीखाली सापडून जखमी झालेले चालक प्रकाश पवार यांची आ. वैभव नाईक यांनी रुग्णालयात केली विचारपूस

ओरोस (प्रतिनिधी): मिठबांव बाजारपेठ येथे शनिवारी पंक्चर झालेल्या एसटीचा टायर जॅक लावून बाहेर काढत असताना अचानक जॅक निसटल्याने एसटी अंगावर पडून चालक प्रकाश (दादू) वसंत पवार (रा. शिरगाव- चाफेड) हे गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले…

खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्यांची स्वच्छता

फोंडा आय टी आय कॉलेज व दुर्गवीर प्रतिष्ठान चा मोहिमेत सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील इतिहासकालीन नोंद असलेल्या खारेपाटण किल्ल्याची व येथील प्राचीन दुर्गादेवी मंदिराची नुकतीच फोंडाघाट आय टी आय कॉलेज चे विद्यार्थी आणि दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने…

महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सिंधुदुर्गनगरीत मेरी माटी मेरा देश उपक्रमाचे आयाेजन

कुडाळ (अमाेल गाेसावी) : अस्सल मालवणी कुकारो या शीर्षकाखाली आज सिंधुदूर्गनगरीत भव्य रॅली काढत लेझिम ढोलपथक स्वच्छतेचा नारा देत ओरोस जिल्ह्याच्या राजधानीत मेरी माटी मेरा देश हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला येथील राजधानीतील माती भव्य कलशातून केंद्रात दिल्ली येथे जाणार…

फोंडावासियांनी आपले घर- परिसर स्वच्छ ठेवल्यास ‘स्वच्छता ही सेवा’ हे उद्दिष्ट साध्य होईल सरपंच संजना आग्रे.

उगवाई- फोंडाघाटातील ऐतिहासिक ‘माझी माती- माझा देश’ अंतर्गत अमृत कलशाचे पुजन राष्ट्रीय कॅडेट कोर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुला- मुलींचे धुवांधार पावसात स्वच्छता अभियान ! ग्रामस्थांकडून कौतुक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रत्येक अबाल- वृद्ध महिला- पुरुष- नागरिकांनी आपले घर- व्यवसाय- परिसर…

— केल्याने होत आहे रे ss — फोंडाघाट ग्रामपंचायती चा स्तुत्य कौतुक सोहळा !

गणेशोत्सव काळातील सर्वांचे सहकार्य सदैव राहू दे ! — संजना आग्रे फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काळात बाजारपेठेतील व्यापारी, पोलीस,होमगार्ड, ट्रॅफिक पोलिस,रिक्षा- टेम्पो चालक, भाजी विक्रेते, वीज कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे वाहतूक खंडित न होता, प्रवाही राहिली. त्यामुळे उत्सवादरम्यान आलेल्या चाकरमानी…

कुडाळ मालवण तालुक्यात ४ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या आश्वासनांचा आणि बोलघेवड्या योजनांचा करणार भांडाफोड कुडाळ (अमाेल गाेसावी) : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा आणि बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी “होऊ दे…

वाघेरी गांगोमाऊली,पावणादेवी मंदिरात चोरी

कणकवली (प्रतिनिधी) : वाघेरी गावातील गांगोमाऊली पावणादेवी मंदिरातील पितळे च्या पूजा साहित्यावर चोरट्यांनी हात मारला असून 12 हजार 400 रुपयांच्या वस्तू चोरल्या आहेत.पितळे च्या 20 घंटा, 2 समई, 1धुपारत, 2 घंटी, 2 लामनदिवे, 1 पंचारती आदी साहित्य चोरीला गेले आहे.…

‌जेष्ठ नागरिक दिनानिमित्त साई आश्रय वृद्धाश्रम येथे समतादुताने केले फळ वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : जेष्ठ नागरिक यांचा सन्मान करण्यासाठी समतादुत सदानंद जाधव यांनी साई आश्रय वृद्धाश्रम व्यवस्थापक किरण पाटील यांची भेट घेऊन जेष्ठ नागरिकांना गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला व तदनंतर फळवाटप करण्यात आले. जेष्ठ नागरिकांच्या वतीने तसेच व्यवस्थापक किरण पाटील…

खारेपाटण केंद्र शाळेत राष्ट्रपिता म.गांधी यांची जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत राष्ट्रपिता म.गांधी यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी…

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या कोकण विभाग संपर्कप्रमुख पदी डॉक्टर गणेश उर्फ भाई बांदकर यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांनी नुकतीच प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग – देवगड मधुन डॉ. गणेश उर्फ भाई रामचंद्र बांदकर यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी किसान मोर्चा- संपर्क प्रमुख म्हणुन ठाणे…

error: Content is protected !!