कणकवली (प्रतिनिधी) : वाघेरी गावातील गांगोमाऊली पावणादेवी मंदिरातील पितळे च्या पूजा साहित्यावर चोरट्यांनी हात मारला असून 12 हजार 400 रुपयांच्या वस्तू चोरल्या आहेत.पितळे च्या 20 घंटा, 2 समई, 1धुपारत, 2 घंटी, 2 लामनदिवे, 1 पंचारती आदी साहित्य चोरीला गेले आहे. ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते 2 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ च्या दरम्यान चोरी झाली आहे. फिर्याद चंद्रकांत गणपत गुरव यांनी दिली असून तपास फोंडाघाट दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे करत आहेत.
वाघेरी गांगोमाऊली,पावणादेवी मंदिरात चोरी











