उगवाई- फोंडाघाटातील ऐतिहासिक ‘माझी माती- माझा देश’ अंतर्गत अमृत कलशाचे पुजन
राष्ट्रीय कॅडेट कोर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुला- मुलींचे धुवांधार पावसात स्वच्छता अभियान ! ग्रामस्थांकडून कौतुक !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रत्येक अबाल- वृद्ध महिला- पुरुष- नागरिकांनी आपले घर- व्यवसाय- परिसर ची स्वच्छता दररोज करून ग्रामपंचायत तिला सहकार्य केल्यास, शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या संकल्पनेचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल. त्याकरिता यापुढे वाड्या-वाड्या, बाजारपेठ, घर- परिसर यातील स्वच्छतेकडे प्रत्येकाने सतर्क रहावे, असे आवाहन फोंडा ग्राम.पं.सरपंच संजय आग्रे यांनी केले. अमृत कलशाच्या पूजनानंतर त्या बोलत होत्या.यावेळी अमोल तेली यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.त्यांचे समवेत ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, विभाग प्रमुख डॉ. सुरवसे, डॉ.ताडेराव, हायस्कूलचे शिक्षक तसेच दोन्ही विभागाचे कॅडेट्स विद्यार्थी- विद्यार्थिनी या अभियानात सहभागी झाले होते. कॅडेट्स विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि ग्रामपंचायतचे स्वच्छतादुत यांनी ग्रामपंचायती पासून एस.टी. स्टँड या बाजारपेठेतील रस्त्याची, दुतर्फा कागद-प्लास्टिक- बॉटल्स इत्यादी कचरा जमा करून स्वच्छता केली. त्यामुळे संततदार पावसामधील फोंडाघाट मधील ग्रामपंचायत- कॉलेज- हायस्कूलचे “स्वच्छता ही सेवा” अभियाना चे कौतुक करून बाजारपेठेतील ग्राहक, व्यापारी, नागरीक यांनी कौतुक करताना, सर्वांना शुभेच्छा दिल्या….
फोंडाघाटच्या गावाला ऐतिहासिक- सांस्कृतिक- साहित्यिक आणि राजकीय विविधतेची परंपरा लाभली आहे.याच गावातून तालुक्याला समृद्ध करणारी नदी जाते .या वारश्याची जाण ठेवून, भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, आज ग्रामपंचायत आवारात, ” माझी माती- माझा देश” संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘अमृत कलश’ मध्ये फोंडाघाटच्या पवित्र भुमीतून, वाड्या-वाड्या-नदी- तलाव -शेती मधुन जमा केलेली माती, एकत्रित करून घेण्यात आली. सर्वांनी त्या कलशाचे पूजन केलें.उद्या तो कलश तालुकास्तरावर पाठवून देशपातळीवर सोपवण्यात येणार आहे.











