खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत राष्ट्रपिता म.गांधी यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका स्मिता कोरगावकर, सहदेव कोंडविलकर,सहाय्यक शिक्षिका रेखा लांघी, रुपाली पारकर, अलका मोरे,आरती जेजोन,अमृता ब्रम्हदंडे,अबिदा काझी,अंगणवाडी शाळेच्या सेविका श्रीम मोहिरे आदी मान्यवर तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर खारेपाटण केंद्र शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे सादर केली.तर शाळेच्या शिक्षकांनी म.गांधी यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्याना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शाळेच्या शिक्षिका रुपाली पारकर यांनी मानले.












