— केल्याने होत आहे रे ss — फोंडाघाट ग्रामपंचायती चा स्तुत्य कौतुक सोहळा !

गणेशोत्सव काळातील सर्वांचे सहकार्य सदैव राहू दे ! — संजना आग्रे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काळात बाजारपेठेतील व्यापारी, पोलीस,होमगार्ड, ट्रॅफिक पोलिस,रिक्षा- टेम्पो चालक, भाजी विक्रेते, वीज कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे वाहतूक खंडित न होता, प्रवाही राहिली. त्यामुळे उत्सवादरम्यान आलेल्या चाकरमानी आणि वाहतूकदारांकडून, गावची प्रशंसा करण्यात आली. यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा,त्यांच्या संस्थेचा, विभागाचा प्रतिनिधीक सत्कार स्व. महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून ग्रामपंचायत फोंडाघाटकडून करण्यात येत आहे . असेच सहकार्य यापुढे कायम ठेवून,गावच्या विकासामध्ये सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन सरपंच सौ.संजना आग्रे यांनी केले.

ग्रामपंचायत सभागृहात हा सत्कार आणि कौतुक सोहळा पार पडला. प्रारंभी स्व.महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी यशवंत मसुरकर-अध्यक्ष व्यापारी संघटना, संजय नेरुरकर – हेल्प अकॅडमी, अण्णा तायशेटे – ग्राम सुरक्षा दल,उत्तम वंजारे — पोलीस हेड कॉन्स्टेबल,प्रसाद हळदिवे – भाजी संघटना, नरेश मांजरेकर- टेम्पो संघटना, राजेश कोथंबिरे – रिक्षा संघटना, निमिष सावंत- वीज कर्मचारी, कुमार नाडकर्णी-विशाल रेवडेकर- पत्रकार आणि पाणीपुरवठा कर्मचारी ग्रा.पं.व फोंडा यांचा प्रतिनिधी सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक विलास कोलते, राजू पटेल, राजन नानचे ,विश्वनाथ जाधव आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सत्कारमूर्तींनी ग्रामपंचायतचे आभार मानताना, स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले .आज समाजाभिमुख, विकासात्मक काम करताना गावच्या परंपरा-संस्कृती- संस्कार यांचे दर्शन नव्या पिढीसमोर आदर्शवत ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ग्रामपंचायतच्या सकारात्मक विकास कामांना शुभेच्छा दिल्या . प्रास्ताविक कोलते यांनी तर, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजू पटेल यांनी केले…..

error: Content is protected !!