एसटीखाली सापडून जखमी झालेले चालक प्रकाश पवार यांची आ. वैभव नाईक यांनी रुग्णालयात केली विचारपूस

ओरोस (प्रतिनिधी): मिठबांव बाजारपेठ येथे शनिवारी पंक्चर झालेल्या एसटीचा टायर जॅक लावून बाहेर काढत असताना अचानक जॅक निसटल्याने एसटी अंगावर पडून चालक प्रकाश (दादू) वसंत पवार (रा. शिरगाव- चाफेड) हे गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आमदार वैभव नाईक यांनी रविवारी रुग्णालयात भेट देऊन पवार यांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, राजू गवंडे आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!