फोंडा आय टी आय कॉलेज व दुर्गवीर प्रतिष्ठान चा मोहिमेत सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील इतिहासकालीन नोंद असलेल्या खारेपाटण किल्ल्याची व येथील प्राचीन दुर्गादेवी मंदिराची नुकतीच फोंडाघाट आय टी आय कॉलेज चे विद्यार्थी आणि दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने साफ सफाई व स्वच्छता करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकला यावर्षी साडे तीनशे वर्षे पूर्ण झाली असल्या कारणाने तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोंबर या जयंती दिनाचे औचित्य साधून रविवारी किल्ले खारेपाटण व सबंधित परिसराची साफ सफाई फोंडाघाट आय टी आय कॉलेजचे प्राचार्य सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ५० विद्यार्थी शिक्षक यांनी श्रमदान करून किल्ल्याची स्वच्छ्ता केली. तर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी देखील या स्वच्छ्ता मोहिमेत सहभाग घेतला. या स्वच्छता मोहीम उपक्रमास खारेपाटण गावच्या सरपंच सौ.प्राची ईसवलकर यांनी सदिच्छा भेट देत उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी खारेपाटण किल्ले संवर्धन समितीचे कार्यवाह मंगेश गुरव, ऋषिकेश जाधव,श्री देव काल भैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण चे अध्यक्ष मधुकर गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण गावच्या वतीने स्वच्छता मोहिमेत सहभागी विद्यार्थी शिक्षक व दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.व खारेपाटण किल्ल्याची संपूर्ण साफ सफाई व स्वच्छता केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.