आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीद्वारे निदर्शन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. तसेच बेमुदत संप कालावधीत शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने आज क्रांतीदिनी बाईक रॅली काढून निदर्शने केली.देशभरात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विविध आंदोलने…

देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खडयांसंदर्भात निवेदन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डे आणि तब्बल १२ वर्षे रखडलेल्या महामार्गाच कामाचा निषेध करण्यासाठी व रायगड मधील पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलनाला पाठींबा देत निवेदन देण्यात आले.यावेळी देवगड तालुका पत्रकार…

तलाठी सजांच्या अधिसूचनेवर हरकती मांडण्याच्या कालावधीत सुनील घाडीगावकर झोपले होते का?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख सुधीर घाडीगावकर यांचा सवाल मालवण (प्रतिनिधी) : मालवण पंचायत समितीचे सभापती राहिलेल्या सुनील घाडीगावकर यांनी तलाठी सजावरून आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करून आपले अज्ञान प्रकट केले आहे. ठेकेदारी करून स्वतःच्या कुटूंबाचा विकास करणाऱ्या…

बांधकाम कामगार महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना देण्यात येणारे विविध वस्तूरुपी लाभ बंद करून केंद्र सरकारच्या धोरणानुसार लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खाती जमा करा. या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बांधकाम कामगार महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने हजारो बांधकाम कामगार एकवटून…

किशोर कदम यांची झिम्माड महोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड!

मसुरे (प्रतिनिधी) : कणकवलीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व किशोर कदम यांची झिम्माडमहोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. झिम्माड महोत्सवाच्या संयोजिका व महाराष्ट्र कला रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक यांनी याबाबतची घोषणा केली आहे.‌ कणकवलीतील कलमठ या गावी राहणारे किशोर…

पोईप ग्रामपंचायत येथे कृषीकन्यांचे स्वागत !

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पोईप गावात दाखल झालेल्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील कृषी कन्यांचे सरपंच श्रीधर राघोजी नाईक यांनी स्वागत केले.ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत कृषिकन्या गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावाची शेती…

महामार्गाच्या कामासदर्भातील रायगड पत्रकराच्या आंदोलनाला मुख्यालय पत्रकार संघाचा पाठिंबा

मुंबई गोवा महामर्गाचे काम पूर्ण करण्यासाठो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महामार्गाच्या रखडलेल्या कामा संदर्भात रायगडच्या पत्रकारानी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनाला सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने पाठींबा देत महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठो जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर, कॉलेज खारेपाटणमध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ ग्रहण सोहळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत आज ९ ऑगस्ट २०२३…

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे आयोजित सन – २०२३ सिंधुरत्न टॅलेंट सर्च अर्थात एस टी एस परीक्षेत कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून…

पेंडूर गावात कृषीदूतांच स्वागत ; ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत कृषि महाविद्यालय किर्लोसचा उपक्रम

चौके ( अमोल गोसावी ) : छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय किर्लोस – ओरोस येथील ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२३ /२४ अंतर्गत मालवण तालुक्यातील पेंडूर गावामध्ये कृषीदूतांचे आगमन झाले आहे. सदर विद्यार्थी गावामध्ये राहून गावची…

error: Content is protected !!