शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर, कॉलेज खारेपाटणमध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ ग्रहण सोहळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत आज ९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांतीदिनी सकाळी १०.०० वाजता पंचप्राण शपथ ग्रहण सोहळा शाळेच्या मैदानावर संपन्न झाला.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य संजय सानप तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच ५८ – महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी ऑफिसर आणि जवळजवळ ६०० विद्यार्थी उपस्थित होते.”मुठभर माती ” हातात घेऊन हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शपथ देण्याचे काम प्रशालेचे शिक्षक श्री. सचिन शेट्ये यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!