सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे आयोजित सन – २०२३ सिंधुरत्न टॅलेंट सर्च अर्थात एस टी एस परीक्षेत कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

खारेपाटण केंद्र शाळेतील एकूण ५४ मुलांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये सर्व मुलांनी सुयश प्राप्त केले असून शाळेच्या ३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावून मेडल प्राप्त केली आहेत. ईयत्ता २ री तील विद्यार्थी प्रथमेश राजू कट्टी याने ११६ गुण मिळवून ब्राँज मेडल प्राप्त केले आहे. तर इयत्ता ६ वी तील कु.सोहम संतोष लोकरे याने १४० गुण तर कु.राहत फातिमा इरफान सारंग हीने १३२ गुण मिळवित सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.सन – २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एस टी एस परीक्षेत खारेपाटण केंद्र शाळेतील खालील विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून सुयश प्राप्त केले आहे. ईयत्ता २री मध्ये कु.संबोधी संदेश पाटणकर – ११० गुण व प्रवीण साधू मिनके – ९२ गुण, इयत्ता ३ री मध्ये कु.अन्वी निशिकांत शिंदे – ८६ गुण व कु.सांची संतोष पाटणकर ८० गुण, ईयत्ता ४ थी – अथर्व प्रसादकुमार गाठे – ११० गुण व कु.देवयानी आनंद चौरे – १०६ गुण इयत्ता ६ वी कु.समृध्दी सचिन भालेकर – ९२ गुण तर इयत्ता ७ वी मधील कु.अपूर्वा राजेश जाधव – ७६ गुण व कु.संस्कृती सचिन निग्रे – ६८ गुण मिळविले. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.प्रियंका गुरव तसेच शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!