शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख सुधीर घाडीगावकर यांचा सवाल
मालवण (प्रतिनिधी) : मालवण पंचायत समितीचे सभापती राहिलेल्या सुनील घाडीगावकर यांनी तलाठी सजावरून आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करून आपले अज्ञान प्रकट केले आहे. ठेकेदारी करून स्वतःच्या कुटूंबाचा विकास करणाऱ्या आणि निकृष्ट कामे करून शासनाचा निधी खाणाऱ्या सुनील घाडीगावकर यांना जनहिताच्या प्रश्नावर बोलण्याचा मुळात अधिकार नाही.असरोंडी आणि शिरवंडे हे गाव भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मोठे असल्याने महसूल यंत्रणेने शासकीय निकषानुसार असरोंडी व आंबवणे आणि किर्लोस व शिरवंडे अशा प्रकारे लगत गावांची हद्द पाहून दोन वेगवेगळ्या सजा निश्चित केल्या. त्याबाबत हरकती मांडण्यासाठी त्याची अधिसूचना संबंधित सर्व गावांमधील ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. शिरवंडे ग्रामपंचायतीवर गेली २५ वर्षे भाजपची सत्ता आहे. या कालावधीत सुनील घाडीगावकर व त्यांच्या सरपंच यांनी या अधिसूचनेवर हरकत का घेतली नाही.त्यावेळी सुनील घाडीगावकर झोपले होते का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख सुधीर घाडीगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
पूर्वी किर्लोस, असरोंडी, आंबवणे, शिरवंडे या गावांचा तलाठी सजा एकत्र होता.त्यामुळे लोकांची कामे अनेक दिवस प्रलंबित राहत होती.नागरिकांना ताटकळत रहावे लागत होते.वारंवार तलाठी सजा मध्ये फेऱ्या घालाव्या लागत होत्या. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी दोन सजा मंजूर करून घेतले. परंतु महसूल यंत्रणेने शासकीय निकषानुसार सजामधील गावांची निश्चिती केली. असरोंडी आणि शिरवंडे हे गाव भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मोठे असल्याने असरोंडी व आंबवणे आणि किर्लोस व शिरवंडे अशा प्रकारे लगत गावांची हद्द पाहून दोन वेगवेगळ्या सजा करण्यात आल्या. हि कार्यवाही होत असताना याबाबतची अधिसूचना हरकती मांडण्यासाठी संबंधित सर्व गावांमधील ग्रामपंचायत मध्ये १५ दिवस प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
शिरवंडे ग्रामपंचायतीवर गेली २५ वर्षे भाजपची सत्ता आहे. या कालावधीत सुनील घाडीगावकर व भाजपच्या सरपंच यांनी या अधिसूचनेवर हरकत का घेतली नाही.त्यावेळी सुनील घाडीगावकर झोपले होते का? सुजाण नागरिकांच्या केवळ दोनच हरकती शासकीय यंत्रणेकडे प्राप्त झाल्या. त्यावर मंडळ अधिकारी यांनी अहवाल सादर केला आहे. आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करण्यापेक्षा गेलॆ दिड वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे.या दीड वर्षात सुनील घाडीगावकर यांनी शिरवंडे तलाठी सजा आणि गावच्या विकासासाठी काय प्रयत्न केले. याचा खुलासा त्यांनी करावा असे आवाहन शाखाप्रमुख सुधीर घाडीगावकर यांनी केले आहे.













