देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खडयांसंदर्भात निवेदन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डे आणि तब्बल १२ वर्षे रखडलेल्या महामार्गाच कामाचा निषेध करण्यासाठी व रायगड मधील पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलनाला पाठींबा देत निवेदन देण्यात आले.यावेळी देवगड तालुका पत्रकार अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर,सचिव सचिन लळीत,जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र मुंबरकर,हेमंत कुलकर्णी,संतोष कुलकर्णी,प्रशांत वाडेकर,सुरज कोंयडें,स्वप्निल लोके,विश्वास मुणगेकर,राजेंद्र साटम आदी उपस्थित होते. या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, कोकणातील सर्वांगीन विकासासाठी रखडलेल्या या मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने कोकण वासीयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नी प्राधानान्ये लक्ष देऊन एक तप रखडलेल्या महामार्गांच काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आम्ही देवगड तालुका पत्रकार समिती हे निवेदन देऊन रायगडमधील पत्रकारांच्या आंदोलनास सुध्दा जाहीर पांठीबा निवेव्दाना व्दारे देण्यात आले.

error: Content is protected !!