चौके ( अमोल गोसावी ) : छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय किर्लोस – ओरोस येथील ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२३ /२४ अंतर्गत मालवण तालुक्यातील पेंडूर गावामध्ये कृषीदूतांचे आगमन झाले आहे. सदर विद्यार्थी गावामध्ये राहून गावची शेतीविषयक कार्यपद्धती, विविध संस्था , शाळा , शेतीवर आधारीत विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेणार आहेत. कृषीदूतांच्या या गटामध्ये सुजय लालासो शेंडे , सार्थक राजेंद्र घनवट, चेतन विठ्ठल टेंगले, शुभम अंकुश कुंभार, महेंद्र नामदेव तरंगे, अथर्व संतोष काळे, माऊली महादेव तरंगे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान पेंडूर ग्रामपंचायतच्या वतीने सदर कृषीदूतांचे स्वागत करण्यात आले यावेळी यावेळी सरपंच नेहा परब, उपसरपंच विवेक जबडे, पोलीस पाटील विश्वनाथ मालवणकर, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल कुलकर्णी, ग्रामसेविका कोठावळे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य समृध्दी सरमळकर, अंकिता सावंत, सुमित सावंत, कृष्णा मांडकुलकर, संदीप सरमळकर, शशी पाटकर, प्रदीप सावंत, सत्यवान सावंत तसेच आरोग्य सेवक आशा सेविका इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.













