आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सावंतवाडीच्या रिक्त तहसिलदारपदी श्रीधर पाटील यांची नियुक्ती

सावंतवाडी (प्रतिनिधी): येथील तहसीलदारपदी श्रीधर पाटील यांना आज पासून कायम नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश त्यांना प्राप्त झाले असून आज पासून ते आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. तर या ठिकाणी कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी तहसीलदार अरुण उंडे यांना आता प्रांताधिकारी म्हणून…

युवासेना कणकवली तालुका व कलमठ विभागसाठी नवीन नियुक्त्या जाहिर

युवासेना संघटकपदी नितेश भोगले व कलमठ शहरप्रमुख पदी धीरज मेस्त्री जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्त पत्र कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे युवानेतृत्व, युवासेना प्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली तालुक्यातील विविध ठिकाणी…

कुडाळातही वारकऱ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध

महाविकास आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा कुडाळ ( अमोल गोसावी ) : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ आज, मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने आ. वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष…

विजेच्या खेळखंडोब्यावरून देवबागवासीय आक्रमक ; विजवीतरण कार्यालयाला ठोकले टाळे

मालवण (प्रतिनिधी): विजेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी देवबाग ग्रामस्थांनी आगाऊ सूचना देऊनही वीज वितरण चे अधिकारी कार्यालयात उपस्थित न राहिल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले आहे. अधिकारी येईपर्यंत टाळे खोलणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

संदीप ऑन ऍक्शन मोड …आणि प्रश्न चुटकीसरशी निकाली

कलमठ साठी तात्काळ नवीन वायरमन नियुक्त 4 दिवसात गावात नवीन वीजखांब देणार कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावातील वीज समस्येबद्दल सरपंच संदीप मेस्त्री ऍक्शन मोडवर आले आणि ग्रामस्थांसह आक्रमक पवित्रा घेत थेट विजवीतरण च्या ऑफिसला टाळे ठोकताच कलमठ गावचा विजेचा प्रश्न निकाली…

” नवीन कुर्ली वसाहत ला ” स्वतंत्र ग्रामपंचायतीची मंजुरी द्या

आमदार नितेश राणे यांची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी नवीन कुर्ली वसाहतीतील जनतेची मागणी होणार पूर्ण परिपूर्ण प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे पाठवला असून त्याला त्वरित मंजुरी द्यावी कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील पुनर्वसीत “नवीन कुर्ली वसाहत ” साठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन…

कलमठ ग्रामस्थांचे ग्रामीण वीज कार्यालयाला टाळे

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह कलमठवासीय आक्रमक कणकवली (प्रतिनिधी): कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे ,कमी दाबाचा पुरवठा ,नादुरुस्त वीज खांब , अपुरे कर्मचारी , अधिकरी नॉट रिचेबल अश्या अनेक तक्रार…

नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत चे स्वप्न साकार करण्यामागे अनंत पिळणकर

भाजपा आणि शिवसेनेच्या आयत्या पिठावर रेघोट्या कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी मागील 12 वर्षे मी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीसाठी माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन…

टोलधाड ….14 जूनपासून ओसरगाव टोलनाक्यावर टोलवसुली

स्थानिक वाहनांच्या टोलमाफी चा मुद्दा अनुत्तरित ; सोयीसुविधांचे आश्वासन हवेत विरले कणकवली (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार) कोल्हापूर कार्यालयाकडून एका दैनिकात टोल वसुली बाबत जाहीर सूचना देणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ओसरगाव टोल…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अधिकृत रेकने खरिप हंगामापूर्वी खत दाखल

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अधिकृत रेकने खरिप हंगामापूर्वी १५१२ मॅट्रिक टन सुफला खत दाखल झाले ही निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कृषी क्रांतीची पहिली पहाट ठरली आहे अशी माहिती…

error: Content is protected !!