कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांची आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी कणकवली येथे भेट घेतली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विविध प्रश्न आमदार महोदयांसमोर मांडले. सन २००६ ते २०१८ पर्यतच्या १०४ जि.प.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय एक वेतनवाढीचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले.
लढा मंच प्रमुख जेष्ठ शिक्षक शिवराज सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले. तसेच निवेदन दिले. या भेटीवेळी शामसुंदर सावंत, आनंद जाधव, संतोष जाधव, धर्मराज धुरत, महेश गावडे, शशांक अटक, सिताराम लांबर,रामचंद्र वालावलकर, सुर्यकांत साळुंखे, संदीप परब, इंदु डगरे, शर्वरी सावंत आदी उपस्थित होते.या भेटीचे नियोजन शिक्षक आनंद जाधव आणि सचिन जाधव सर यांनी केले होते.