कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ता संतोष चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सवात दुर्गामातेची प्रथम पूजा भाजपाचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ता संतोष चव्हाण यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. भाजपा कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सव दुर्गामातेच्या मूर्तीचे ढोल ताशांच्या गजरात आज आगमन झाले. पुरोहितांच्या हस्ते मंत्रोच्चारांत प्राणप्रतिष्ठापणा केल्यानंतर दुर्गामातेची विधिवत प्रथम पूजा संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. संतोष चव्हाण यांचे नेहमीच सामाजिक , धार्मिक, शैक्षणिक कार्यात योगदान असते. भाजपा कणकवली आयोजित नवरात्रोत्सवातही संतोष चव्हाण यथाशक्ती सक्रिय योगदान देत मनोभावे देवीची पूजा अर्चना करतात.