कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने “हिंदी पखवाडा” अंतर्गत हिंदी कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रभाषा हिंदी भाषेच्या प्रचारार्थ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हिंदी भाषेचा राष्ट्रीय सन्मान वाढविण्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी हिंदी सन्मान प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.युवराज महालिंगे,इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ कदम, हिंदी विभाग प्रमुख प्रा. दीपा तेंडोलकर आदी उपस्थित होते.
हिंदी पखवाडा अंतर्गत हिंदी कविता वाचन उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.या मध्ये कला शाखेच्या एकूण बारा विद्यार्थ्यांनी भाग घेतला.”हिंदी भाषा समृद्ध बनविण्यासाठी हिंदी भागातील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील संवाद साधावा हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्याचे वाचन करावे व राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करावा” असे मत यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले. हिंदी कविता वाचन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी हिंदीतील प्रसिद्ध कवी भवानी प्रसाद मिश्र, धुमिल, मैथिलीशरण गुप्त अशा अनेक कवींच्या कवितांचे वाचन केले. प्रा. स्वीटी जाधव व प्रा. व्ही. आर. सावंत यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली..सूत्रसंचालन प्रा. व्ही. सी. सावंत यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डी. डी. तेंडोलकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जी. जी. कुनकवळेकर यांनी केले.या कार्यक्रमास हिंदी विभागातील विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.