भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांनी दिले प्रत्युत्तर
कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा चे बोलघेवडे तालुका प्रमुख जयेश नर हे उचले शिवसैनिक असून त्यांनी प्रथम स्वतः च्या पक्षा चे कार्यकर्ते कोण कोण आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे . मुळात यांचा कुठल्या ही कार्यकर्त्यांशी संपर्क नसल्या मूळे व तेवढी त्यांची कुवत ही नसल्या मुळे उबाठा गटाचे कार्यकर्ते निराश होऊन अन्य पक्षात पक्षप्रवेश करत आहेत. तसेच कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या विकासाच्या धडाडी मुळे व सतत असलेल्या संपर्का मुळेच प्रभावित होऊन इतर पक्षा चे कार्यकर्ते व नेते मंडळी भारतीय जनता पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करत आहेत .आमच्यावर टिका करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण जयेश नर व मित्रमंडळ यांनी करावे. पक्ष संभाळणे ही त्यांची कुवत नाही. दिशाभूल करून पाठ थोपटून घेणं हे आमचं काम नाही. आमचं पक्ष नेतृत्व आमची पाठ कायमच थोपटत असते. आमदार नितेश राणे यांच्या कार्य पद्धतीने प्रेरित होऊन प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते आज ही आमच्या सोबतच आहेत.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही बापर्ड गावानी भारतीय जनता पार्टी ला भरघोस असे मतदान केले आहे ९५० झालेल्या मतदानात जवळपास ६०० मतदान हे आमच्या भाजपाला झाले आहे राणे कुटुंब व भारतीय जनता पार्टी यांच्या वर फक्त सतत टिका करणे हे एकच काम आता उबाठा नेते मंडळीला उरलं आहे त्यामुळे नर यांनी आमचं मोजमाप करण्या पेक्षा स्वतः चे कार्यकर्ते सांभाळा असा प्रेमाचा सल्लाही नारकर यांनी नर यांना दिला आहे.