कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वि जयंती कणकवली तालुक्यतील असलदे ग्रामपंचायत येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच चंद्रकांत डांबरे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचा फोटोला पुष्पहार घालण्यात आला आणि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, सदस्य दयानंद हडकर, ग्रामसेवक संजय तांबे, आशा सेविका भाग्यश्री नरे बाई, सीआरपी सानिका तांबे आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते स्वछता दिनाचे अवचित साधून ट्राय सायकल व संकलन शेडचे उदघाटन करण्यात आले.